अखेर वैभव नाईक बोलले

Edited by:
Published on: December 04, 2023 15:11 PM
views 669  views

मालवण : नौदल दिन माझ्या मतदारसंघात होत आहे. त्यामुळे स्थानिक आमदार म्हणून मी सर्वाचे स्वागत करतो. छत्रपती शिवाजीमहाराज यांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदल दिन साजरा होत आहे. याची उत्सुकता सर्वाना आहे. हजारो लोक हा सोहळा पाहतील. सिंधुदुर्गात साजरा होणाऱ्या नौदल दिनासाठी सर्वाना स्थानिक आमदार म्हणून मी शुभेच्छा देत आहे. अशी प्रतिकीया उबाठा सेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. मालवण तारकर्ली येथे नौसेना दिनाच्या पाश्र्वभूमीवर आयोजित कार्यक्रम स्थळी आमदार वैभव नाईक बोलत होते. आमदार वैभव नाईक हे सपत्नीक दाखल झाले आहेत.