...अखेर 'कोकणसाद LIVE' चा अंदाज ठरला खरा | जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस

उपाध्यक्षपदी भाजपचे संतोष नानचे | भाजपने केली खेळी
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 21, 2023 12:35 PM
views 478  views

सिंधुदुर्ग : आठही खरेदी विक्री संघावर भाजपच प्राबल्य असलेल्या जिल्हा संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस यांच्या गळ्यात अध्यक्षपदीची माळ // तर भाजपचे संतोष नानचे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ // कोकणच नंबर वन महाचॅनेल कोकणसाद LIVE ने एक दिवस अगोदरच भाजपच्या खेळीचा व्यक्त केला होता अंदाज // कोकणसाद LIVE ने व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत ठरला खरा // भाजपचे आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतूल काळसेकर यांनी आखलेली खेळी झाली यशस्वी // अखेर भाजपचे नेते केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे व्हिक्टर डॉन्टस यांच्या नावावर केलं शिक्कामोर्तब // राष्ट्रवादीचे मोठे नेते अजित पवार भाजपात जाणार, अशी राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा असताना जिल्ह्यात मात्र भाजप- राष्ट्रवादीने एकत्र येत नव्या राजकीय समीकरणांची केली सुरुवात // नव्या राजकिय समीकरणाचे केंद्रिय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे आहेत किमयागार //