...अखेर एसटी स्टँडवरील खड्डे बुजवले !

Edited by: विनायक गावस
Published on: August 10, 2023 18:22 PM
views 663  views

सावंतवाडी : एसटी बस स्थानकाची  दुरावस्था दूर करण्याबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रशासनाच लक्ष वेधल होत.तीव्र आंदोलन छेडल होत. या आंदोलनाला यश आले आहे. आज पासून सावंतवाडी एसटी बस स्थानकाच्या परिसरातील रस्त्याचे काम, लाईट, तसेच पत्रे बदलणे व पेवरब्लॉकने खड्डे बुजवणे या कामाची सुरुवात  युद्धपातळीवर  सुरू झाली आहे. 

यात बबन साळगावकर यांच्यासह जिल्हा प्रवासी संघटना अध्यक्ष अण्णा केसरकर, ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, रवी जाधव, दत्तप्रसाद गोठस्कर, प्रदीप ढोरे, उमेश खटावकर प्रदीप नाईक, राजा शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर,बंड्या तोरस्कर ,दिलीप पवार ,दीपक सावंत मनवेल अल्मेडा, सुधीर पराडकर, उदय भराडी यांनी एक मताने आंदोलन छेडले होते. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मनसे, शिवसेना ठाकरे गट यांसह विविध संघटनांनी देखील याप्रश्नी आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. हे काम सुरू झाल्याच पाहून प्रवासी व नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे.