अखेर पिकुळेतील ते भगदाड बुजविले

Edited by: लवू परब
Published on: September 27, 2025 15:27 PM
views 176  views

दोडामार्ग : पिकुळे देऊळवाडी परिसरात असलेल्या मोरीजवळ मुख्य रस्त्याला एक मोठे भगदाड पडले होते. पिकुळे सरपंच आपा गवस यांनी सां. बांधकाम विभागाला संपर्क करून अखेर ते भगदाड बुजविले. 

पिकुळे देऊळवाडी येथील मुख्य रस्त्यावर एक मोरी आहे. या मोरीजवळ रस्त्याला एक मोठे भगदाड पडले आहे. भगदाडामुळे मोठा गोलाकार खड्डा तयार झाला असून, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना तो लांबून दिसत नसल्याने ते थेट त्या खड्ड्यात अडकण्याचा धोका निर्माण झाला होता. विशेषतः रात्रीच्या वेळी, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि कोणताही सूचना फलक नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्यावरून विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, महिला आणि दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी संबंधित विभागाला सरपंच आपा गवस यांनी संपर्क करून भगदाडा विषयी कल्पना दिली शनिवारी ते भगदाड सार्वजनिक बांधकाम विभागाने बुझविले. त्यामुळे सरपंच आपा गवस यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जातं आहे.