अखेर 'महसूल'ने बाजी मारली | 15 पैकी 4 जागांवर महसूल खात्याचे उमेदवार विजयी

सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्था निवडणूक
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 21, 2022 14:43 PM
views 314  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये 15 संचालकांपैकी कणकवली, वैभववाडी,कुडाळ, व मालवण अशा 4 तालुका संचालक पदावर महसूल खात्याचे उमेदवार निवडून आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया सत्यवान माळवे व अशोक पोळ यांनी व्यक्त केली आहे.

निवडणुकीपूर्वी संचालक पदाच्या निवडणुकीसाठी महसूल खात्यातीलच उमेदवार जास्त उभे राहिल्याची टिका केली जात होती. व महसूलचे 3300 पैकी केवळ 190 मतदार असल्यामुळे एकही उमेदवार निवडून येणार नाही असा प्रचारातील मुद्दा होता. असे असतानाही 15 पैकी 4 संचालक महसूल खात्याचे निवडून गेल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

दुसरीकडे पोलीस खात्याचे सुमारे 650 मतदार असून त्यांचे 3संचालक व कोर्ट खात्त्याचे 220 सभासद असताना 3संचालक तसेच नगरपरिषदांचे 100 सभासद असून 1 संचालक, भूमि अभिलेख 1, आरोग्य विभागातून 1, कोषागार 1 व पाटबंधारे 1 असे खातेनिहाय संचालक निवडून गेले आहेत.

एकंदरीत महसूल विभागाचे सभासद संख्‍या कमी असून देखील मतदारांनी महसूल विभागाचे उमेदवारांना कौल दिलेला आहे. सभासद संख्या कमी असताना मतदारांनी दाखविलेल्‍या विश्‍वास याबद्दल सर्व मतदारांचे आभार, यापुढे महसूल विभागाचे संचालकांमार्फत ठेवीची पूर्ण सुरक्षितता ठेवण्यासाठी पुढील योग्य व पारदर्शक कारभार करणेसाठी आमचे विभागाचे संचालक  प्रयत्‍न करतील असा विश्‍वासही यावेळी सत्‍यवान माळवे व अशोक पोळ यांनी व्‍यक्‍त केला.