
वैभववाडी : रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद असलेला गगनबावडा -कोल्हापुर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्रीपासून प्रवासी वाहतूक सुरू झाली. मात्र बालिंगा येथील पुलावरून अवजड वाहतूकीला मनाई आहे. ही वाहतूक वळीवंडे मार्गानें वळविण्यात आली. या मार्गावरील एसटी वाहतूक सुरळीत झालेली नाही.