स्टॉल हटाव मोहिमेवर अखेर तोडगा ; आ. नितेश राणे यांनी केली यशस्वी मध्यस्थी

स्टॉलधारकांचं पुनर्वसन करणारी वाभवे-वैभववाडी ठरणार महाराष्ट्रातली पहिली नगरपंचायत
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 14, 2023 12:00 PM
views 268  views

वैभववाडी : शहरातील शासकीय जागेतील स्टाॅल हटविण्याबाबत अखेर तोडगा निघाला. शहरातील  स्टॉल गुरुवारी स्वतः स्टाॅलधारक काढणार आहेत. त्यांना तात्पुरती पर्यायी जागा देऊन त्यानंतर कायमस्वरूपीचे पुनर्वसन केले जाणार आहे, अशी माहिती आ.नितेश राणे यांनी स्टाॅलधारकांसोबत झालेल्या बैठकीनंतर दिली.

   शहरातील स्टाॅलचा विषय सध्या तापला होता. नगरपंचायतीने स्टाॅल हटविण्याची भुमिका घेतली होती. याला स्टॉलधारकांनी विरोध केला होता. यासंर्भात आज आ.नितेश राणे यांनी नगरपंचायतीत स्टाॅलधारक, नगरसेवक यांची बैठक घेतली. या बैठकीत आ. राणे यांनी कुणाचेही नुकसान होणार नाही, असा  स्टाॅलधारकांना शब्द दिला. या स्टालधारकांना सध्या शासकीय गोदाम, गणपती विसर्जन घाटाकडे जाणा-या रस्त्याच्या कडेला तात्पुरती जागा दिली जाणार आहे. त्यानंतर नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेत या स्टॉलधारकांच पुनर्वसन केले जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रथमच स्टॉलधारकांच पुनर्वसन करणारी आमची नगरपंचायत ठरणार आहे. या प्रकल्पाचे १ मे २०२३ रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याचे आ.राणे यांनी सांगितले.