कोकणसादचा Impact | वैभववाडी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 02, 2023 19:16 PM
views 319  views

वैभववाडी : वैभववाडी रेल्वे स्थानक परिसरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.दै.कोकणसाद ने या संदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. यानंतर प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे.वाहनचालक व प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

   रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. प्रवेशद्वारावरच मोठं मोठं खड्डे पडले होते. त्यामुळे रिक्षाचालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. या खड्ड्यांमुळे रिक्षा थांबविण्यासाठी याठिकाणी जागा उपलब्ध नव्हती. याबाबत दै.कोकणसाद याने रेल्वे स्थानकातील समस्याबाबत आवाज उठवला होता. याबाबतची बातमी प्रसिद्ध करून या विषयाला वाचा फोडली होती.

यानंतर शिवसेना ठाकरे गटाने स्टेशन व्यवस्थापकांना खड्डे बुजविण्याबाबत निवेदन दिले होते. अखेर प्रत्यक्षात आजपासून खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहन चालक व प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे