
मंडणगड : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाण्याचे माध्यमातून आक्षेपार्य शब्द वापरुन बदनामी करणाऱ्या स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीसाठी 28 मार्च 2025 रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, शहरप्रमुख विनोद जाधव यांच्या उपस्थितीत मंडणगड पोलीस स्थानकात पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात शिवसैनिकांचे स्फुर्तीस्थान शिवसेना नेते व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कुणाल कामरा यांनी केलेली बदनामी आम्ही शिवसैनीक खपवून घेणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहे. याचबरोबर कामरा यांनी गाण्याचे माध्यमातून केलेल्या वक्क्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करीत असून त्याचे विरोधात रितसर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर यांची सही असून निवेदनाची प्रत तहसिलदार मंडणगड यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. . यावेळी चेतन सातोपे, योगेश जाधव, निलेश गोवळे, प्रविण जाधव, दीपक मालुसरे, संजय शेडगे, विकास पवार, अक्षय भगत, आनंद भाटे, अस्मिता केंद्रे, योगेश जंंगम, प्रतिक पोतनीस, सेजल गोवळे, वैशाली रेगे, यांच्या शिवसेना, युवासेना महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.