
वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, यांच्यावर व्यंगनात्मक गाणं म्हणत कुणाल कामरा यांनी टीका केली. या गाण्यात कुणालनी एकनाथ शिंदे गद्दार म्हणून उल्लेख केलाय. दरम्यान या प्रकरणी युवासेना वेंगुर्ला कुणाल कामरा यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत आहेत. या वक्तव्याबद्दल कुणाल यांने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर माफी मागावी किंवा त्यांना अटक करण्यात यावी. तसे न झाल्यास युवासेना आक्रमक भूमिका घेईल असा इशारा वेंगुर्ला युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, तालुका संघटक विशाल राऊत, तालुका मिडियाप्रमुख स्वप्नील होसमानी, वेंगुर्ला शहर संघटक वेदांग पेडणेकर, उभादांडा विभाग प्रमुख नयन पेडणेकर, प्रतीक खानोलकर, प्रेमानंद जाधव, सचिन जुवलेकर, पराग सावंत, मनोज परुळेकर, कल्पेश डेरे, शिवराम सातार्डेकर, चंद्रशेखर कुबल आणि इतर सर्व युवासैनिक उपस्थित होते.