LIVE UPDATES

वीज अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा ; मांगेलीवासीय आक्रमक

सख्ख्या भावांना विजेचा धक्का
Edited by: लवू परब
Published on: June 14, 2025 20:54 PM
views 265  views

दोडामार्ग :  मांगेली येथील सख्ख्या भावांना विजेचा धक्का लागून मृत पावलेल्या नागेश गवस व गंभीर जखमी असलेल्या संदीप गवस यांच्या नातेवाईकांना शासकीय नोकरी व आर्थिक नुकसान भरपाई द्यावी व विजवितणवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील मांगेली वासीय व स्थानिक राजकीय पुढऱ्यांनी केली आहे. जो पर्यंत विजवितरणचे अधीक्षक अभियंता येत नाही तोपर्यंत मृतदेह हाती घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला.

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालंय येथे तहसीलदार प्रज्ञा राजमाने, पोलीस निरीक्षक हेमचंद खोपडे, डॉ अनिकेत गुरव, उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, भाजप तालुका प्रमुख दीपक गवस, माजी जि. प.  उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, नगरसेवक संतोष नानचे, पराशर सावंत, संदेश राणे व मांगेली ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित आहेत. रुग्णालयात  तहसीलदार विजवितरणच्या अधिकाऱ्यांना सर्वांनी घेराव घालत चांगलेच फैलावर घेतले आहे. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात सध्या तणावाचे वातावरण असल्याचे चित्र दिसून आले.