
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधदुर्गच्या वतीने जिल्ह्यात नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या चर्मकार समाजबांधवांचा सत्कार सोहळा रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता रुद्र सभागृह (श्री.अनिल चव्हाण यांचे घरी),गजानन महाराज नगर,गजानन महाराज मठ नजीक,गोसावी वाडी,तांबे भवन शेजारी कणकवली येथे जिल्हा व तालुका मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. तरी समाजातील सर्व नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच ,ग्रा.पं. सदस्य यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, कणकवली तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण,तालुका सरचिटणीस अविनाश चव्हाण यांनी केले आहे.