दोडामार्गात वडील आणि मुलगा बेपत्ता

Edited by:
Published on: July 16, 2025 18:25 PM
views 1188  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे बोडण गावचे रहिवासी अभिमन्यू अर्जुन नाईक (मूळ रा. शिरंगे बोडण, सध्या रा. कुटाळीम, साळशेत, गोवा) हे चार दिवसांपूर्वी त्यांचा ११ वर्षांचा मुलगा आकाश नाईक याला सोबत घेऊन घरात कोणालाही न सांगता निघून गेले आहेत. ते अद्याप घरी परतले नाहीत.

याबाबत अभिमन्यू नाईक यांची पत्नी, अनुष्का अभिमन्यू नाईक (रा. कुटाळीम, साळशेत) यांनी कुडतरी, गोवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही बेपत्ता व्यक्तींची फिर्याद आता दोडामार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिमन्यू नाईक गोवा येथून शिरंगे बोडण येथील आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते, परंतु ते घरी पोहोचलेच नाहीत. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन दोडामार्ग तालुक्यातील तेरवण गावात दाखवत होते. गोवा पोलिसांनी त्या ठिकाणी शोधही घेतला, मात्र दोघे सापडले नाहीत.

वरील फोटोतील वडील आणि मुलगा (अभिमन्यू अर्जुन नाईक आणि आकाश नाईक) आढळून आल्यास तात्काळ कुडतरी, गोवा पोलीस किंवा दोडामार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.