
देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत व पुरवठा विभाग यांच्याविरुद्ध देवगड तहसील कार्यालयासमोर दोघांनी उपोषण केले. याधील प्रशांत खवळेकर हे देवगड - जामसंडेच्या नगरपंचायत विरोधात उपोषणाला बसले आहेत. तसेच विजयदुर्ग येथील गणेश कीर हे पुरवठा विभागाच्या विरोधात उपोषणाला बसले होते.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीने खाजगी जागेतील सांडपाण्याशी आमचा काही संबंध नाही असे उत्तर दिल्याने प्रशांत खवणेकर हे उपोषणास बसले होते.
आपली आई वृद्ध असून तिला रेशन दुकानावर रेशन घेण्यासाठी जाता येत नाही. यामुळे तिचा मुलगा म्हणून तिला माझ्या अंगठ्यावर तिचे रेशन मिळावे यासाठी वारंवार पत्रव्यवहार करून पुरवठा विभाग दाद देत नसल्याने पुरवठा विभागाच्या गैरकारभाराविरोधात विजयदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश कीर यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांची नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी भेट घेतली.