दोडामार्गला पिंपळपानच्या 'फॅशन शो स्पर्धेत नव्या फुलारी' प्रथम

Edited by: संदीप देसाई
Published on: November 29, 2023 20:10 PM
views 184  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील पिंपळपान हौशी महिला मंडळ बाजारपेठच्या वतीने आयोजित भव्य फॅशन शो स्पर्धेत नव्या फुलारी हिने प्रथम क्रमांक पटकावला. प्रिया गावडे हिने द्वितीय, तर संचिता म्हावळणकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थं पारितोषिक अनुजा गवस हिला देण्यात आले. होममिनिस्टर स्पर्धेत रंजना सावंत हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय सपना शिरोडकर, तर गौरी माजीक हिने तृतीय क्रमांक पटकावला.

       त्रिपुरारी पौर्णिमा व दिपोत्सवाची सांगता या दोघांचे औचित्य साधत पिंपळपान होशी मंडळ बाजारपेठ दोडामार्गने सोमवारी अनेक रंगारंग कार्यक्रमांचे भव्य आयोजन पिंपळेश्वर सभागृहात केले होते. या कार्यक्रमामध्ये रेकॉर्ड डान्स, होममिनिस्टर व फॅशन शो चा समावेश होता. सकाळच्या सत्रात डॉ. कालिंदी गोविंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. या शिबिराचा जवळजवळ चाळीसच्या आसपास महिलांनी लाभ घेतला.

      या कार्यक्रमांत आयोजित होममिनिस्टर स्पर्धेत अनेक महिलांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. अनेक गमतीदार खेळ या होममिनिस्टर स्पर्धेत होते. या स्पर्धेत रजना सावंत ( झरेबांबर) या प्रथम सपना शिरोडकर ( खोलपेवाडी साळ गोवा) या द्वितीय, तर गौरी माजीक ( झरेबांबर) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

फॅशन शो मध्ये नव्या फुलारी प्रथम

       पिंपळपान ने प्रथमच खाश महिलावर्गासाठी फॅशन शो स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत नऊवारी, सहावारी व वेस्टर्न असे तीन राऊंड होते. पहिल्या व दुसऱ्या राऊंडमध्ये पिंपळपान ग्रुप मधील महिला व स्पर्धेतील स्पर्धक सहभागी झाले होते. मात्र हे दोन्ही राऊड स्पर्धेत समाविष्ट नव्हते, तीसरा राऊड फक्त स्पर्धकांसाठी होता. यामध्ये दोडामार्ग शहरातील नव्या फुलारी ( बाजारपेठ ) हिने प्रथम क्रमांक. प्रिया गावडे ( गावडेवाडी) हिने द्वीतीय, तर संचिता म्हावळणकर ( घाटवाडी ) हिने तृतीय क्रमांक पटकावला, उत्तेजनार्थ पारितोषिक सासाली येथील अनुजा गवस हिला देण्यात आले. या स्पर्धेला प्रेक्षकांची उत्स्फुर्त दाद मिळाली. स्पर्धेत युवती व माय लेक जोडवा सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद कामत यांनी केले. होममिनिस्टर तसेच फॅशन शो मधील विजेत्या स्पर्धकांना पिंपळपान ने भेटवस्तु देऊन गौरविले.

बाईपण भारी देवा म्हणत महिला थिरकल्या रंगमंचावर

होम मिनिस्टर तसेच फॅशन शो स्पर्धेसोबत अनेक रेकॉर्ड डान्सचे देखील आयोजन करण्यात आले होते. खुद्द पिंपळपान मधील अनेक महिला कोळी नृत्य, एमजी डान्स, तसेच ' बाईपण भारी देवा' या गाण्यांवर रंगमंचावर मोठ्या उत्साहात थिरकल्या. प्रेक्षकांनी देखील याला उदंड प्रतिसाद दिला.