कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना दाखवले जीवामृताचे प्रात्यक्षिक...!

Edited by:
Published on: August 20, 2023 21:10 PM
views 75  views

सिंधुदुर्ग :  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस, ओरोस मध्ये चतुर्थ वर्षात शिकत असणाऱ्या कृषीकन्यांनी कसाल येथे शेतकऱ्यांना जीवामृताचे प्रात्यक्षिक करून दाखवले व शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे यासाठी मार्गदर्शन केले.

जीवामृत हे मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढविण्यासाठी शेतीसाठी वरदान आहे. सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रसायने आणि रासायनिक खतांचा वापर केला जात आहे. त्यामुळे जमिनीचा दर्जा खालावत असून शेत नापीक होत आहे.

रासायनिक खते आणि कीटकनाशकांवर भरपूर पैसा खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे आणि ते त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करू शकतात.यालाच जीवामृत हे उत्तम पर्याय आहे. कृषी महाविद्यालयाचे प्रा. योगेश पेडणेकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. महेश परुळेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली  वैष्णवी जाधव, सृष्टी पाटील, ऋतुजा जाधव, सोनाली साळुंखे, रोहिणी कोळी या विद्यार्थिनींनी हा उपक्रम पार पाडला.