म्हापण मंडळातील पर्जन्य मापक यंत्राच्या चुकीच्या जागेमुळे शेतकरी विमा रक्कमेपासून वंचित | पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष

Edited by: दिपेश परब
Published on: August 04, 2023 10:58 AM
views 594  views

वेंगुर्ला : म्हापण मंडळातील पर्जन्य मापक यंत्र चुकीच्या जागेत असल्याने म्हापण मंडळामध्ये गेली ३ वर्ष याठिकाणच्या हवामाच्या रिपोर्ट मध्ये बाकीच्या लगतच्या मंडळापेक्षा बरीच तफावत आढळते. त्यामुळे दरवर्षी पीक विम्याची रक्कम भरून पण अनेक शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई रक्कम मिळत नाही ते या योजनेमध्ये वंचित राहतात त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते. दरम्यान ही बाब माजी सभापती निलेश सामंत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच पर्जन्य मापक यंत्राची जागा बदलून दुसरीकडे घेण्याची विनंती केली. 

यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पर्जन्य मापक यंत्र इतरत्र बदलून देणे त्याचप्रमाणे चालू वर्षी म्हापण मंडळ मधील शेतकऱ्यांना विमा कवाचा पासून वंचित राहावं लागू नये त्यासाठी संबंधित खात्याशी चर्चा करून वेंगुर्ले तालुक्यातील इतर मंडळ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विमा कवचाच्या सरासरी विमा कवच म्हापण मंडळातील शेतकऱ्यांना मिळवून देऊन या विषयी लवकरच तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय देऊ असे आश्वासन दिले.

यावेळी परुळे चेअरमन सोसायटी तथा कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये, माजी चेअरमन प्रकाश राणे, परुळे सोसायटी व्हा. चेअरमन तथा बाजार समिती सदस्य प्रसाद पाटकर उपस्थित होते.