सावंतवाडीत अकरा दिवसांच्या गणरायाला जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 30, 2023 11:22 AM
views 121  views

सावंतवाडी : तालुक्यातील अकरा दिवसांच्या गणरायाला जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोष अकरा दिवसांच्या गणरायाच विसर्जन करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत गणरायाला भक्तीभावानं निरोप देण्यात आला. ‌

शुक्रवारी सायंकाळी बहुतांश ग्रामीण अकरा दिवसांच्या गणरायाच वाजत गाजत विसर्जन करण्यात आलं. नदी, नाल्यावर मोठी गर्दी पहायला मिळाली. शहरात देखिल मोती तलाव येथे गणरायाला निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी लवकर ये असं मागण लाडक्या गणरायाला भक्तांनी घातल.