रवळनाथ मित्र मंडळाकडून देवस्थानास पंखे

Edited by:
Published on: May 14, 2024 12:28 PM
views 133  views

बांदा : पाडलोस रवळनाथ मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमावेळी वाढत्या उष्म्यामुळे भाविकांना त्रास होत होता. याची दखल घेत श्री देव रवळनाथ मित्र मंडळ पाडलोस यांनी देवस्थानास दोन पंखे प्रदान केले. श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिगंबर नाईक, दशरथ पंडित, दिलीप गावडे यांच्या हस्ते दोन स्टॅन्ड पंखे प्रदान करण्यात आले. यावेळी मानकरी आनंद गावडे, सदानंद गावडे, अनिल गावडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. 

रवळनाथ मित्र मंडळाने यापूर्वी भाविकांसाठी बसण्यासाठी बाकांची व्यवस्था केली होती. आता दोन स्टॅन्ड पंखे देवाच्या चरणी अर्पण केल्याने मडुरा पंचक्रोशीत रवळनाथ मित्र मंडळाचे कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत गावडे यांनी केले. बंटी गावडे यांनी प्रास्ताविक करत मंडळाच्या कार्याची माहिती दिली. आभार निहार गावडे व गोविंद माधव यांनी मानले.