मिलाग्रीसमध्ये फॅन्सी ड्रेसची धूम

120 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
Edited by: विनायक गांवस
Published on: September 10, 2025 12:58 PM
views 81  views

सावंतवाडी : येथील मिलाग्रीस प्रशालेमध्ये फॅन्सी ड्रेस उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये मराठी प्रायमरी, इंग्लिश प्राइमरी व हायस्कूलमधील तब्बल १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विविध धर्मांमधील संत, महान व्यक्ती यांच्या वेशभूषेतून 'सर्वधर्मसमभावाची संकल्पना' रुजवीत विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला.


 विविध धर्मातील संतांची वेशभूषा तसेच त्यांनी समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी स्वीकारलेली विचारधारा या अनुषंगाने उपक्रमामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी संतांचे विचारही या वेशभूषा अंतर्गत सादर केले. या उपक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निलराज सावंत यांनी केले. उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर, इंग्लिश प्राइमरी पर्यवेक्षिका क्लीटा परेरा, मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर कविता चांदी आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालडना यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.