१ मे रोजी श्री देवी सातेरी कोलगांव ग्रामस्थ मंडळ, मुंबईचा कुटुंब स्नेहमेळावा

मुंबईतील काळाचौकी येथील ए. ई.एस. बँक्वेट, अभ्युदय एज्युकेशन स्कूल हॉलमध्ये होणार कार्यक्रम
Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2023 13:27 PM
views 125  views

मुंबई : श्री सातेरी कोलगांव ग्रामस्थ मंडळ, मुंबईची २०१९ साली स्थापना झाली.  कोरोना व नंतरच्या काही घडामोडींमुळे मंडळाच्या सदस्यांच्या कौटुंबिक भेटीगाठी झाल्या नाहीत. या भेटीगाठी व्हाव्यात व त्यातून नव्याने झालेल्या ओळखी अधिक वृद्धिंगत व्हाव्यात या दृष्टीने सोमवार, दिनांक १ मे २०२३ रोजी सकाळी ९ ते ३ यावेळेत कुटुंब स्नेहमेळावा आयोजित केला आहे. विद्यार्थी व गुणीजनांचा गौरव देखील करण्यात येणार आहे.


मुंबईतील काळाचौकी येथील ए. ई.एस. बँक्वेट, अभ्युदय एज्युकेशन स्कूल हॉल, अभ्युदय नगर इमारत क्र. १८च्या समोर, काळाचौकी, मुंबई - ४०० ०३३ येथे हा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. 


मुंबई व कोलगावातील सर्व  कोलगांववासीयानी या सोहळ्यास उपस्थित रहावे, अशी विनंती श्री सातेरी कोलगांव ग्रामस्थ मंडळ, मुंबई करीत आहे.