समस्या सोडविण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश ; माजी नगराध्यक्षा प्रणाली माने यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप !

Edited by: प्रतिनिधी
Published on: January 21, 2023 21:25 PM
views 161  views

देवगड : देवगड - जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर एक वर्षाची वचनपूर्ती पाहिली असता सत्ताधारी नगरपंचायत पदाधिकाऱ्यांना सातत्याने या भागातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याकरता अपयश आले असून आपले अपयश लपविण्यासाठी मागील पाच वर्षात देवगड जामसंडे मधील जनतेला अभिप्रेत असलेला विकास झाला असल्याने स्थानिक आमदारांच्या नावाने अपप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी नगरसेवक करीत आहेत, विद्यमान सत्ताधारी नगरसेवकांना जनतेच्या समस्या सोडविण्यास पूर्णतः मागील एक वर्षात अपयश आले असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका प्रणाली माने यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला. नगरपंचायतीची एक वर्षाची वचन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर यानिमित्त विरोधी गटाचे भाजपचे गटनेते शरद ठुकरुल त्यांच्या उपस्थितीत नगरसेविका तन्वी चांदोस्कर, आद्या गुमास्ते, रुचाली पाटकर यांच्या उपस्थितीत विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, मागील पाच वर्षात विरोधकांची सत्ता राज्यात असताना अनेक विकास कामे जनतेचे प्रश्न हे यापूर्वीच्या देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील सत्ताधाऱ्यांकडून व सध्याच्या विरोधी गटाच्या नगरसेवकांकडून मार्गी लागले होते. प्रसंगी त्या पाच वर्षाच्या कालावधीत देवगड-जामसंडे मधील पाण्याचा प्रश्न न भेडसावता कधीही पाणीटंचाई अथवा पाण्याविना स्थानिक नागरिकांचे हाल झालेले नाहीत. मागील पाच वर्षाच्या कालावधी नगरपंचायतचे हेच कर्मचारी काम करत होते या कर्मचाऱ्यांवर तत्कालीन सत्ताधारी नगरसेवकांचा वचक व काम करून घेण्याची वृत्ती होती. परंतु विद्यमान सत्ताधारी नगराध्यक्ष अथवा नगरसेवकांना प्रशासनावर अंकुश ठेवण्यात पूर्णतः ठरली आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अभियाना देखील यापूर्वी नगरपंचायतने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग घेऊन प्रसंगी रँक देखील प्राप्त केला होता. पण विद्यमान सत्ताधारी यांचा स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग देखील नसल्याचे ज्यांनी आरोप करून गेली वर्षभर येथील स्थानिक जनतेला वेठीस धरून जनतेच्या समस्या सोडविण्याकरता कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. अथवा विकास कामे मार्गी लावलेली नाही नसून प्रशासनाला टार्गेट करून उपोषणाचा इशारा सत्ताधारी नगरसेवकांनी देणे हे दुर्दैव असून प्रशासनात हे पूर्णपणे सर्व सत्ताधारी हे अनभिज्ञ आहेत. आणि प्रशासन आणि सत्ताधारी नगरसेवक यांचा कोणताही सुसंवाद नसल्याने जनतेचे प्रश्न मार्गी लागत नसल्याचे त्याने शेवटी आवर्जून सांगितले.