लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीतर्फे विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

‘डोळ्यांची निगा’ विषयावर डॉ. विशाल पाटील यांचे मार्गदर्शन
Edited by: विनायक गावस
Published on: August 26, 2023 11:15 AM
views 158  views

सावंतवाडी : सावंतवाडी लायन्स क्लब मार्फत नेत्र तपासणी व डोळ्यांची निगा कशी राखावी या विषयावर मार्गदर्शन शिबिर येथील सुधाताई कामत जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मध्ये आयोजित करण्यात आले होते.

सध्या डोळ्यांची साथ आली आहे त्यामध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्यावी. डोळे आले तर त्यावर उपचार कसे करावेत याविषयी येथील नेत्ररोग तज्ञ डॉ. विशाल पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.  यावेळी शाळेतील 145 विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली.तपासणी केलेल्या मुलांना चष्मा लागला आहे. त्या मुलांना सावंतवाडी लायन्स क्लब मार्फत मोफत चष्मा देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे अध्यक्ष अमेय पई, खजिनदार अभिजित पणदुरकर, खजिनदार सुनील दळवी,अशोक देसाई, बाळासाहेब बोर्डेकर, श्रीकांत म्हापसेकर, सुनीता टकेकर, जितेंद्र पंडित, सोमेश टकेकर ,प्रकाश राऊळ तसेच लायन्स क्लब चे इतर पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक उपस्थित होते.