चित्रकला स्पर्धेस मुदतवाढ

Edited by:
Published on: February 13, 2025 20:03 PM
views 27  views

सावंतवाडी : बांदेकर कला महाविद्यालयातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेची चित्रे महाविद्यालयात जमा करण्याची अंतिम मुदत या अगोदर दिनांक ३०/०१/२०२५ होती. ही चित्रे जमा करण्याचा दिनांक चित्रकला स्पर्धेस मिळणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे २४/०२/२०२५ पर्यंत वाढविण्यात आला आहे. जास्तीत जास्त शाळांनी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या दृष्टिने यात मोठ्याप्रमाणात सहभाग दर्शवावा. प्रत्येक प्रशालेतून व प्रत्येक गटातून प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला महाविद्यालयात निमंत्रीत करुन अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. अंतिम फेरी व पारितोषिक वितरण महाविद्यालयात वार्षिक कला प्रदर्शन कल्पक च्या दरम्यान घेण्यात येईल अशी माहिती आयोजकांनी दिली.

अधिक माहितीसाठी प्रा.तुकाराम मोरजकर ९४०५८३०२८८ यांच्याशी संपर्क साधावा.