सावंतवाडीतून महागडी दुचाकी चोरीस..!

Edited by: विनायक गावस
Published on: June 17, 2023 21:48 PM
views 90  views

सावंतवाडी : येथील बस स्थानक परिसरात उभी करून ठेवलेली महागडी दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. हा प्रकार काल उघडकीस आला. याप्रकरणी दुचाकी मालक अनंत शिवाजी मोरजकर (रा. वर्धे, ता. कुडाळ) यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञाता विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्री मोरजकर यांनी ९ जूनला आपली दुचाकी (एमएच ०७ एआर १७६८) ही सावंतवाडी बस स्थानक परिसरात उभी करून ठेवली होती. आणि ते आजरा येथे कामानिमित्त गेले होते. ते काल पुन्हा आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पाहिले असता त्यांना आपली दुचाकी आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी इतर ठिकाणी शोधाशोध केली. मात्र दुचाकी कोठेही आढळून न आल्याने त्यांनी आज येथील पोलीस ठाण्यात आपली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.