
सावंतवाडी : माडखोल येथील पराडकर फार्मच्या माध्यमातून देशी- विदेशी ताज्या आणि पौष्टिक भाजांच उत्पादन घेतलं जातं आहे. एकाच पॉली हाऊसमध्ये सहा भाज्यांच उत्पादन घेतलं जातं असून येत्या रविवारी १४ एप्रिलला 'एक्सोबाईट' या ब्रॅण्डच अनावरण करण्यात येणार आहे अशी माहिती प्रगतशील शेतकरी मनोज पराडकर यांनी दिली. तर या शुभप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी सिंधुदुर्गकरांना केलं आहे.
माडखोल नमसवाडी येथील पराडकर फार्ममध्ये ऑयस्टर मशरूम, चेरी टोमॅटो, ब्रोकोली, झुकीनी, हॅलपीनो आदी भाज्या पिकवल्या जातात. ऑयस्टर मशरूम हे पुर्णपणे ऑर्ग्रॅनिक असून सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. याच आणखीन प्रोडक्शन वाढवित असून प्राधान्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरवठा केला जाणार आहे. यासह गोवा मार्केटमध्येही हे प्रोडक्ट उपलब्ध होणार आहेत. येत्या १४ एप्रिलला माडखोल येथील फार्महाऊस येथे 'एक्सोबाईट' या ब्रॅण्डच अनावरण होणार असून या शुभारंभप्रसंगी अभिनेते राजेंद्र शिसतकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रसाद देवधर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचदरम्यान गावातील विद्यार्थांना शिष्यवृत्ती, गावातील प्रयोगशील जिल्हा परिषद शाळेस मदत व शेतीसाठी योगदान देणाऱ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून किमान ३०० जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार देण्याचा आमचा मानस आहे. भविष्यात देशी गाईंच संगोपन इथं केलं जाणार आहे अशी माहिती प्रगतशील शेतकरी मनोज पराडकर यांनी दिली. तर रविवारी १४ एप्रिलला शुभारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.