शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ प्रतिकृती आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन..!

अर्चना फाउंडेशनच आयोजन
Edited by: विनायक गावस
Published on: February 16, 2024 10:25 AM
views 293  views

सावंतवाडी : महाराष्ट्राचं आराध्य दैवत, स्वराज्य संस्थांपक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या संकल्पनेतून अर्चना फाऊंडेशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगभरातील दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृती आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे सिंधुदुर्गवासीयांना पाहण्यासाठी १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमासाठी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध कलाकार बहिर्जी नाईक फेम अजय तापकिरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जास्तीत जास्त इतिहासप्रेमी, शिवअभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन ‘आपला जाणता राजा’ ३५० वर्षांपूर्वी नक्की कसा दिसत होता. अस्सल फोटो प्रतिकृती, त्याबद्दल असणारी माहिती सोबतच शिवकालीन शस्त्र पहावयास मिळणार आहेत. काझी शहाबुद्दीन हॉल,सावंतवाडी येथे  १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत या संधीची अनुभूती नक्कीच घ्यावी असे आवाहन अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केले आहे.