ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ !

६ एजंटावर गुन्हा दाखल
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 26, 2023 19:55 PM
views 350  views

कणकवली : कणकवली पोलिसांनी ऑनलाईन जुगाराविरोधात कारवाई केली आहे. कणकवलीत ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या ६ एजंटांना पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेत मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ गुन्हा कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. त्यामध्ये संशयित आरोपी उत्तम वाळके,सचिन शिरसाट,मयूर महाडेश्वर,प्रथमेश चव्हाण ,प्रीतम म्हापसेकर ,भावेश चव्हाण(सर्व रा.कणकवली) आदीचा सामावेश आहे. या ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या  कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.


या कारवाईमुळे काही जणांनी आपल्या मोबाईलमधून ऑनलाईन जुगाराचे ॲप डिलीट केले आहे. ऑनलाईन जुगार स्वतः खेळत असेल आणि त्या ऑनलाईन जुगारांवर दुसऱ्याचे पैसे लावून खेळ खेळवला गेला तर तो गुन्हा आहे. सर्व ताब्यात घेतलेल्या लोकांना पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी करुन त्या आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे. ही कारवाई निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रुपेश गुरव,पोलीस हवालदार विनोद सुपल, श्री.नाईक , पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, राज आघाव यांच्या पथकाने केली.