
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार यशवंत उर्फ सुनिल पेडणेकर यांनी गावागावात जात लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले. पैशाला अन् अमिषाला बळी पडू नका. पक्ष बदलू लोकांना थारा देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. चौका चौकात त्यांनी तुफान बॅटिंग केली.
सावंतवाडी, दोडामार्गसह मतदारसंघात पेडणेकर यांनी चांगलीच बॅटिंग केली. मतदार मला साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून लोकशाही बळकट करा, आमिषाला बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले. सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असणाऱ्या कोट्याधीश उमेदवारांसमोरील ते एक मध्यमवर्गीय उमेदवार आहेत.