उपसरपंच निवडीतही भाजपच सरस, उंबर्डे, करूळमध्ये नाराजी नाट्य !

तालुक्यातील १७ पैकी १५ ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजप सदस्यांची निवड
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 28, 2022 12:36 PM
views 571  views

वैभववाडी : तालुक्यातील १७ पैकी १५ ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजप सदस्यांची निवड झाली आहे तर ठाकरे शिवसेना आणि गावविकास पॅनेलचा प्रत्येकी एका ठिकाणी उपसरपंच विराजमान झाला.सरपंच पदाप्रमाणेच उपसरपंच निवडीत भाजपा सरस ठरली.मात्र या निवडीत उंबर्डे आणि करूळमध्ये नाराजीनाट्य रंगले आहे.भाजयुमोचे तालुकाध्यक्ष किशोर दळवी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे तर करूळ येथील महिला सदस्याने देखील राजीनामा दिला आहे.


तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीची पंचवार्षीक निवडणुक जाहीर झाली होती.त्यापैकी सहा ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ११ ग्रामपंचायतीची निवडणुक १८ डिसेंबरला झाली होती.२० डिसेंबरला मतमोजणी झाली होती.दरम्यान १७ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणुक आज पार पडली.उंबर्डे उपसरपंचपदासाठी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष किशोर दळवी हे इच्छुक होते.परंतु प्रत्यक्षात आज आजीम बोबडे यांना उपसरपंचपदी संधी देण्यात आली.त्यामुळे श्री.दळवी हे नाराज झाले आहेत.त्यांनी तत्काळ आपल्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.याशिवाय करूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रेखा सरफरे या इच्छुक होत्या परंतु उपसरपंचपदी सचिन कोलते यांची निवड झाली.त्यामुळे सौ.सरफरे यादेखील नाराज झाल्या असुन त्यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.उर्वरित पंधरा ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच निवडी शांततेत पार पडल्या.


उपसरपंच निवडी पुढीलप्रमाणे-उंबर्डे -आजीम रमझान बोबडे,तिरवडे तर्फे खारेपाटण- सुनिता अनंत सावंत,सडुरे-शिराळे-अनंत जंगम,नानीवडे-सोनाली तांबे,कुर्ली-अंबाजी हुंबे,नावळे-संजय रावराणे,नापणे-जयप्रकाश यादव,करूळ-सचिन कोलते,नेर्ले-पढंरीनाथ सुर्वे,हेत-एकनाथ फोंडके,उपळे-नितीन जाधव,अरूळे-रमेश वारंग,निमअरूळे-संजय कदम,तिथवली-चंद्रकांत पाष्टे,जांभवडे-अस्मिता गुरव,गडमठ-संदीप सावंत,कोळपे-सईदा इसप,