
रत्नागिरी : शिवसेनेचे ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी यांनी आज पत्रकार परिषद घेत तुरुंगात डांबले तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे म्हटलं आहे.
अशा प्रकारच्या नोटीसींना मी भिक घालतं नाही. अशाप्रकारच्या किती कारवाया केल्या तरी मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असं राजन साळवी यांनी म्हटलं. तसेच या सर्व प्रकरणाच्या मागे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असल्याचा आरोपदेखील यावेळी त्यांनी केला