तक्रार देऊनही प्रशासनाने घेतली नाही दखल

अखेर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्वखर्चातून साफसफाई ; मुख्याधिकाऱ्यांवर कुणाचा अंकुश नसल्याचीही केली टिका
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 17, 2023 17:45 PM
views 266  views

मालवण : आडारी गणपती मंदिर येथे आमच्या कालावधीत सुमारे 20 लाख रुपयांचे सुशोभीकरणचे काम करण्यात आले होते. जेणे करून त्याठिकाणी स्थानिक लोकांबरोबर पर्यटक पण आकर्षित होतील. स्थानिकांना एक रोजगाराची संधी पण स्थानिकांना उपलब्ध होऊ शकेल. परंतु मागील वर्षभर याठिकाणी त्याच्या देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. आणि याबाबत स्थानिक लोकांच्या तक्रारी नुसार सुशोभीकरणाच्या ठिकाणच्या   डेकोरेटिव्ह काची साफ करण्याबाबत सप्टेंबर 2022 मध्ये तक्रार देऊनही आज चार महिने उलटून गेले तरी ते काम केलं गेलं नाही. अखेर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्वखर्चातून तेथील डेकोरिटव्ह काचा आणि परिसरातील साफसफाई केली.


आडारी गणेश मंदिर परिसरात EECL कंपनीकडून बसविण्यात येणाऱ्या लाईट आजमिती पर्यत बसविण्यात आल्या नाहीत.  बसविण्यात आलेल्या लाईटला कव्हर नाहीत.  तात्पुरत्या स्वरूपात बसवण्यात आलेल्या बऱ्याच लाईट बंद आहेत.  बसण्यासाठी बसविण्यात आलेले बाकडे मोडकळीस आलेले आहेत. पण याबाबत तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. असलेल्या सुशोभीकरणाची देखभाल करता येत नसताना सध्या फक्त शासनाचा निधी खर्च करण्यासाठी सेल्फी पॉईंटच्या नावाखाली काम उरकण्याच काम कश्यासाठी सुरू आहे हा एक प्रश्न आहे अशी टिका त्यांनी केली.    


 विकास कामे कधी पूर्ण होणार : 

आमच्या कालावधीत मंजूर असलेली भाजी मार्केट, अग्निशमन इमारत, नप आवार सुशोभीकरण, नाट्यगृहा नजीक मल्टिपर्पज एसि हॉल, सफाई कामगार निवासस्थान, भुयारी गटर योजना, इत्यादी विकास कामे आज एक तर बंद आहेत किंवा धीम्या गतीने सुरू आहेत. वारंवार लेखी तक्रार करूनही याबाबत कुठलीही दखल घेतली जात नाही. मुख्याधिकारी यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही अशी परिस्थिती मालवण नपची झालेली आहे. मुख्याधिकारी ज्याप्रमाणे काँट्रॅक्टरच्या रनींग बिलासाठी आग्रही भूमिका घेतात तीच भूमिका विकासकामे पूर्ण करण्यासाठी घेताना दिसत नाहीत ही वस्तुतिथी आहे. आमच्या कालावधीत मालवण  शहराच्या विकासासाठी आमच्या आमदार , खासदार यांच्यामार्फत पाठपुरावा करून मंजूर करून आणलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी आमच्याच लोकप्रतिनिधीना उपोषण करण्याची वेळ येत आहे ही शोकांतिका आहे. 

 

स्ट्रीट लाईट व्यवस्था, स्वच्छता विषयक कामे, बंद असलेल्या खत निर्मितीच्या बायो कंपोस्ट मशीन, बायो  टॉयलेट गाड्या याबाबत वारंवार सूचित करूनही कुठलीही दखल मुकज्याधिकाऱ्यांनी घेतलेली नाही.


 नप व्हाट्सअप ग्रुप कशासाठी : 

      नपच्या व्हॉटसअप ग्रुप वर टाकलेल्या तक्रारीची दखल चार चार महिने घेतली जात नसेल तर असे ग्रुप करून  मालवणच्या जनतेची दिशाभूल  करण्याचं प्रशासनाने थांबवावे असे प्रकर्षाने नमूद करावे लागत आहे.  

 

गोपनीय अहवालात नमूद करण्यासाठी दिखाऊपणा :  

मुख्याधिकारी हे आपल्या बढतीसाठी   आपल्या गोपनीय अहवालात नमूद करण्यासाठी अशा प्रकारचे इव्हेंट,  फोटोग्राफी, आणि कॉम्पुटरवर आकडेवारीचा खेळ करत आहेत  ही वस्तुतिथी आहे.  याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी गोपनीय अहवाल शासनाकडे  सादर  करण्यापूर्वी ज्याप्रमाणे पूर्वी त्या त्या कालावधीतील नगराध्यक्ष यांची  स्वाक्षरी घेतली जात होती तशी स्वाक्षरी घेण्याबाबत आमच्या नगराध्यक्ष संघटने मार्फत शासनाकडे पत्रव्यवहार करणार आहे. मुख्याधिकारी आणि प्रशासक हे पद एकच व्यक्ती उपभोगत असल्याने ही परिस्तिथी निर्माण झाली आहे.  

पण यामुळे त्याचा विपरीत  परिणाम मालवणच्या विकासावर होत आहे.  आणि माजी लोकप्रतिधी असलो तरी पुढील निवडणूका होईपर्यंत याबाबत आवाज उठवणे ही आमची नैतिकता   आहे असेही कांदळगावकर यांनी म्हटले आहे.