सोनुर्ली प्रीमियर लीगमध्ये ईस्वटी स्पोर्ट्स संघाला विजेतेपद

Edited by:
Published on: January 13, 2025 18:36 PM
views 213  views

सावंतवाडी : नवयुवक कला क्रीडा मंडळ सोनुर्ली आयोजित सोनुर्ली प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत इस्वटी स्पोर्ट्स संघाने विजेतेपद पटकाविले तर या स्पर्धेचा उपविजेता संघ टायगर ग्रुप ठरला. 

नवयुवक कलाक्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सोनुर्ली प्रीमियर लीग पर्व सातवे या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत ईसवटी स्पोर्ट्स संघ मालक भूषण ओटवणेकर, क्रेझी इलेव्हन संघमालक नवीन गावकर, टायगर ग्रुप संघमालक बिट्टू नाईक, कमळेश्वर स्पोर्ट्स संगमालक विनायक गावडे, यंग स्टार बॉईज संघमालक मुन्ना जाधव, तर भवानी स्पोर्ट्स संघमालक मुरली हिराप, या सहा संघानी सहभाग दर्शवला होता. शनिवार व रविवार असे दोन दिवस चाललेली ही स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि चुरशीची पाहायला मिळाली असा ही संघाने स्पर्धेतील सामने दरम्यान आपले उत्कृष्ट खेळी खेळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजविले परंतु या स्पर्धेत विजय संघ ठरला तो ईसवटी स्पोर्ट्स संघ. स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम सामना हा इसवटी स्पोर्ट आणि टायगर ग्रुप या दोघांमध्ये पार पडला.

या सामन्यात ईसवटी संघाने ठेवलेले धावसंख्येचे आव्हान टायगर स्पोर्ट संघाला पेलले नाही आणि या स्पर्धेत टायगर स्पोर्ट संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. हा अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानावर मोठ्या संख्येने क्रिकेटर रसिकांची गर्दी जमली होती. बक्षीस वितरण गावचे प्रमुख मानकरी रमेश मंडळाचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. मंडळाकडून स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे सन्मानचिन्ह देऊन आभार व्यक्त केले. ही स्पर्धा यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी वाचनात प्रयत्न केले.