सिंधुदुर्गात शिंदे गटाच्या पहिल्या शाखेची स्थापना ; मंत्री केसरकरांनी फोडला नारळ !

वेंगुर्ला तालुक्यात करण्यात आली पहिल्या शाखेची स्थापना
Edited by: विनायक गांवस
Published on: October 01, 2022 15:04 PM
views 978  views

वेंगुर्ला : शिंदे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या शाखेची स्थापना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला तालुक्यात करण्यात आली. यावेळी अशोक दळवी, किसन मांजरेकर, जि प सदस्य वर्षा कुडाळकर, जेष्ठ नेते महेश सामंत, सावंतवाडी शहर शहरप्रमुख बाबू कुडतरकर, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नीतीन मांजरेकर, सचिन वालावलकर, 

भोगवे सरपंच रुपेश मंडये, राजन पोकळे, नितीन शिरोडकर, माजी सभापती सुनील मोरजकर, विश्वास गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.