वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात पालक शिक्षक संघाची स्थापना

Edited by: भरत केसरकर
Published on: August 12, 2023 11:03 AM
views 190  views

कुडाळ : माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावच्या पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली आहे. पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक त्रिवेणी थिटे, उपाध्यक्ष गणेश कालेलकर, सचिव गिरीष गोसावी तर सहसचिव पदी सुवर्णा बापू झोरे यांची निवड झाली आहे.

शिक्षक पालक संघाची सभा प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती त्रिवेणी थिटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्याध्यापक संजय पिळणकर, पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण, शिक्षक प्रतिनिधी आनंद कदम, महेश पास्ते, शिक्षक प्रशांत आडेलकर, नितीन माने, चंद्रकांत पटकारे, सचिन कुडाळकर, यतिन धुरी, देविका भोसले, साक्षी साटेलकर, पालक संदीप सावंत, समीक्षा साटम, वैष्णवी काणेकर, विशाखा नारकर, करिष्मा भोई, संदीप सावंत, अनिल कोरगावकर, संजना देवळी, स्वाती परब, नंदकिशोर परब आदी उपस्थित होते.