बॅ. नाथ पै सेवांगणच्यावतीने खुली निबंध स्पर्धा !

Edited by: जुईली पांगम
Published on: January 27, 2024 13:31 PM
views 129  views

सिंधुदुर्ग : नुकतच अयोध्येत श्रीराम मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली. याच पार्श्वभूमीवर बॅ. नाथ पै  सेवांगणच्यावतीने विशेष खुली निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. विजेत्यांना आकर्षक बक्षीसही मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. 

'माझ्या मनातील राम' या विषयवार निबंध लिहायचाय. त्यासाठी जास्तीत जास्त 500 शब्दाची मर्यादा ठेवण्यात आलीय. तर विजेत्यांना प्रथम पारितोषिक रु. १५०१/- व प्रशस्तीपत्र, द्वितीय पारितोषिक रु १२०१/- व प्रशस्तीपत्र, तृतीय पारितोषिक रु १००१/- व प्रशस्तीपत्र, उत्तेजनार्थ ५०० रु ची ५ पारितोषिके असणार आहेत. 10 वर्षावरील कोणतीही व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकते. आपले निबंध दि. 28 जानेवारी 2024 पर्यंत दीपक भोगटे मोबाईल नंबर  94238 33163 या नंबर वर व्हाट्सअप करावेत.

तर मंगळवार दि  ३० जानेवारी २०२४ ला दुपारी ३.३० वाजता बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा इथं बक्षीस समारंभ होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन बॅ नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर यांनी केलंय.