महसूल यंत्रणेतील पुन्हा ई ऑफिस सुरू : जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी

महसूल दिनाचा शानदार शुभारंभ !
Edited by: देवयानी वरसकर
Published on: August 01, 2023 18:54 PM
views 207  views

सिंधुदुर्गनगरी :  मंगळवारी साजरा झालेला  महसूल दिन व १ ऑगस्ट पासून सुरू झालेल्या  महसूल सप्ताह निमित्त नागरिकांच्या सेवेसाठी महसूल यंत्रणा सतर्क काम करीत आहे. विविध दाखले, पकडलेले वारस तपास, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड, प्रकल्पग्रस्त दाखले नागरिकांना घरपोच देण्यासाठी विविध ठिकाणी कॅम्प लावून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत घरपोच देण्याचा प्रयत्न या महसूल सप्ताहात राहणार असल्याची माहिती  सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मजूलक्ष्मी यांनी सिंधुनगरी येथील पत्रकार परिषदेत दिली.

         नागरिकांची प्रलंबित राहिलेली कामे महसूल यंत्रणांनी या सप्ताहात जास्तीत जास्त मार्गी लावावी असे नियोजन केले आहे. मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी  व जिल्हाधिकारी स्तरावर  कार्यक्रम ठरविण्यात आले आहेत, नागरिकांची कोणकोणती कामे या अभियान काळात होतील याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आली होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री मच्छिंद्र सुकटे व जिल्हा माहिती अधिकारी मुकुंदा चिलवंत  हेही उपस्थित होते.

          18 वर्षा वरील  कोणताही नागरिक अथवा महाविद्यालयीन विद्यार्थी मतदानापासून वंचित राहू नये म्हणून त्या सर्वांना याच अभियान काळात निवडणूक ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यात एका महाविद्यालयात  हे कार्यक्रम होणार आहेत. वैभववाडी येथील कृषी महाविद्यालय, देवगड येथील केळकर महाविद्यालय, कणकवली कॉलेज, मालवण मधील सका पाटील महाविद्यालय, कुडाळ मधील संत रावळ महाराज विद्यालय, वेंगुर्ला येथील बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालय  येथे या केम चे आयोजन करण्यात येत आहे. या कॅम्पच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निवडणूक ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम होत आहे असे जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी सांगितले.

       मुख्यमंत्री व पंतप्रधान सर रोजगार कर्ज योजना  व शेतकरी पीक कर्ज योजना यामध्ये काही बँका प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांची ही नुकतीच बैठक घेऊन या बँकांना तशा सूचना देण्यात येत आहेत. सरकारी योजनांचा फायदा मिळावा इच्छुक नागरिकांचे कर्ज प्रस्ताव संबंधित बँकांनी स्वीकारावेत व त्यावर कार्यवाही करावी बँकांना देण्यात आल्या आहेत असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

        महसूल सप्ताह निमित्त मंगळवारपासून 7 ऑगस्ट पर्यंत  जिल्ह्यात विविध स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांच्या हस्ते मंगळवारी महसूल दिनाचे उद्घाटन झाले. व उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांचा गौरव जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला. उद्या दोन ऑगस्ट रोजी  कुडाळ येथे युवा संवाद व मतदान जनजागृती अभियान व मतदार नोंदणी करता कॅमचे आयोजन तीन ऑगस्ट रोजी नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टी पूर मध्ये बाधित झालेल्या नागरिकांना एकात्मतेचा हा उपक्रम तहसील कार्यालय कुडाळ येथे दहा ते पाच या वेळात होत आहे. चार ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथे फेरफार अदालत व सलोखा योजनेतील पात्र लाभार्थी व जनसंवाद कार्यक्रम, पाच ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी सैनिक हो तुमच्यासाठी हे अभियान सैनिक माजी सैनिकांच्या प्रश्नासाठी घेतले जाणार आहे. सहा ऑगस्ट रोजी भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या प्रश्नांसाठी या कॅमचे आयोजन करण्यात आले आहे. व सात ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभ कणकवली येथील आज भगवती मंगल कार्यालयात होत आहे महसूल कर्मचारी अधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी दिली.

      प्रशासनातील सेवा अधिक गतिमान व्हावी व ती पारदर्शक राहावी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय मधील इ ऑफिस सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व ते ई ऑफिस पुन्हा सुरू झाले आहे अशी माहिती ही जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी या पत्रकार परिषदेत दिली.