
सावंतवाडी : शिरोडा नाका येथील जलाराम हार्डवेयर यांच्या अंगणात आलेल्या ७ फुटी अजगराला सावंतवाडी येथील सौ. नबीला हेरेकर व त्यांचा मुलगा कबीर हेरेकर यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. नबीला हेरेकर या सावंतवाडी येथील सर्पमित्र नवीद हेरेकर यांच्या पत्नी आहेत. तर कबीर हेरेकर हा आपल्या पालकांचा वारसा जपत असून तोही शहरातील सर्वात लहान सर्पमित्र आहे.