जुबिन नौटियाल यांच्या शोमध्ये बॅण्डशिवाय देखील एन्ट्री, पण...

संजू परब यांची माहिती
Edited by: विनायक गावस
Published on: October 12, 2023 19:24 PM
views 2247  views

सावंतवाडी : भाजप युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि दिमाखात सावंतवाडी जिमखाना मैदानावर साजरा करण्यात येणार आहे. याकरिता सुप्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह शो होणार असून तब्बल ५० हजार लोक उपस्थित राहणार आहेत. यासाठी बॅण्ड शिवाय देखील प्रवेश दिला जाणार आहे. जिल्ह्यावासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन  माजी नगराध्यक्ष तथा भाजपा उपाध्यक्ष संजू परब यांनी केले.


फॉर्म भरुन ज्यांना बँण्ड मिळाला नाही अशांनाही हा कार्यक्रम पाहता येणार आहे. तशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली असून १४ ऑक्टोबरला मोती तलावाच्या काठावर सायंकाळी सात वाजता फटाक्याची आतषबाजी होणार असल्याचेही संजू परब म्हणाले. विशाल परब आमचे मित्र असून समाजासाठी सामाजिक भावनेतून ते विविध उपक्रम राबवितात. भाजप पक्षातील ते सदस्य असल्यानं त्यांच्या मागे आम्ही आहोत. यावेळी भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल,  दिलीप भालेकर ,बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.