
वैभववाडी : तालुक्यातील खांबाळे गावचे उबाठा सेनेचे ग्रामपंचायत सदस्य अमोल अंकुश चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला.आम.नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश या निवासस्थानी भाजपाचा झेंडा हाती घेतला. आम.नितेश राणेंकडून ठाकरे शिवसेनेला धक्कावर धक्के देणे सुरुच आहेत.कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच भाजपात प्रवेश होत आहेत.खांबाळे गावातील ग्रामपंचायत सदस्यासह गावकऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.यामध्ये सूर्यकांत सुतार, आत्माराम सुतार, श्रीकृष्ण पवार, प्रमोद कदम, मारुती सुतार, सुनील सुतार,अनंत पवार, सुनील मोहिते, चंद्रकांत पवार,प्रकाश पवार,सतीश पवार,रवींद्र पवार,पांडुरंग पवार,यांनी आमदार नितेश राणे यांचा समावेश आहे.सर्वांच आम राणे यांनी पक्षात स्वागत केले.यावेळी सिंधुदुर्ग बँक संचालक दिलीप रावराणे उपस्थित होते.