
दोडामार्ग : तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असून, शिवसेनेच्या नावाचा गैरवापर करून बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसला असे दाखवले जात आहे. काल भाजप मध्ये झालेला प्रवेश हा त्यांच्यातील गटा गटातील प्रवेश असून, प्रवेश घेतलेला एकही कार्यकर्ता त्यांचा सेनेशी काहीही संबध नाही, असे तालुका प्रमुख संजय गवस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, काल मंगळवारी दोडामार्ग येथे भाजप पक्षात काहीनी प्रवेश केले ते आपण याअगोदर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होते असे सांगून कार्यकर्ते सेनेचे आहेत, असा उल्लेख केला होता. प्रवेश केलेले कार्यकर्ते हे शिंदे सेनेचे असल्याचे दिसत आहे. ते उबाठाचे नाही त्यामुळे आमच्या पक्षांच्या नावाचा वापर करून भाजप जर वाढत असेल तर त्यांना शुभेच्छा. सत्तेच्या मांडवा खालून गेलेली लोकं कुणाची होऊ शकत नाही. त्यामुळे आमचा पक्ष मजबूत आहे आणि राहणार असे संजय गवस तालुका प्रमुख यांनी म्हटले आहे.