उद्योजक आनंद शेट्ये यांचं गावाप्रती असंही योगदान !

स्वखर्चातून दिशा फलकांची उभारणी
Edited by: संदीप देसाई
Published on: February 22, 2024 14:07 PM
views 170  views

दोडामार्ग : मुंबईस्थित झाले तरी नेहमीच गावाशी नाळ जुळलेले खानयाळे गावचे सुपुत्र प्रथितयश उद्योजक आनंद शेट्ये यांनी आपल्या गावकऱ्यांसाठी स्वखर्चातुन खानयाळे-शिरंगे  आणि त्याच प्रमाणे बोडदे - मांगेली असे दोन दिशा फलक उपलब्ध करून दिले आहेत. त्याचे अनावरण बोडदे गावचे सुपुत्र रमेश दळवी यांनी नुकतेच श्रीफळ वाढवून केले. 

श्री शेट्ये यांच्या या सामाजिक उपक्रमांचे खानयाळे - बोडदे सह चारही गावांतून विशेष कौतुक होत आहे. या फलकाचे अनावरण प्रसंगी उद्योजक आनंद शेट्ये व त्यांच्या  पत्नी सौं. अनुराधा यांसह खानयाळे गावचे माजी सरपंच विनायक शेट्ये, शिरंगे गावचे उपसरपंच संजय गवस,  खानयाळे गावातील संतोष शेट्ये, पंढरीनाथ देऊलकर, शंभा शेट्ये, लक्ष्मण गावडे, लवू गवस, हरिश्चंद्र कोळेकर, आरोग्य खात्याचे प्रमोद तळणकर, सावंत व  उपस्थित सह आदी उपस्थित होते.

   आनंद शेट्ये यांनी स्वखर्चातुन खानयाळे शिरंगे त्याच प्रमाणे बोडदे मांगेली असे दोन दिशा फलक उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व गावातील ग्रामस्थानी आनंद शेट्ये यांचे विशेष आभार मानले आहेत. तर गाव हा माझा श्वास आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी जिथे लागेल तिथं मला हाक द्या, मी सदैव आपल्या सोबत असेन अशी ग्वाही श्री. शेट्ये यांनी या प्रसंगी दिली आहे.


हे ही नसे थोडके !

चाकरमान्यांचे गावशी भावनिक नाते काय असते याच उदाहरणं म्हणजे उद्योजक आनंद शेट्ये होय. खानयाळे सारख्या गावातून मुंबई नगरीत स्वतः चं अस्तित्व निर्माण करून या सुपुत्राने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीय. रांगशलका कंपनीच्या मध्यमातून त्यांनी कित्येक हाताना रोजगार दिला. अनेक देश विदेश दोरे केले. मात्र आपली गावाशी नाळ तुटू दिली नाही. 'मुक्काम खानयाळे' या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून त्यांनी खडतर मात्र एक यशस्वी उत्तुंग प्रवास शब्दबद्ध केला आहे. कितीही मोठं झालो तर गाव म्हणजे माझा श्वास अशी भावना ह्रुदयात बाळगणाऱ्या आनंद शेट्ये यांनी गत वर्षीही आपला गावातील स्मशान भूमीची शेड, तिथंपर्यंतचा जाणारा रस्ता  तिथं बसण्यासाठी एक शेड सुद्धा बांधून दिली होती.  सुमारे ६ लाख रू . त्यासाठी त्यांनी स्वतः हुन खर्च केलेत. केवळ सामाजिक जाणीव म्हणून ते हे कार्य करतात, हे विशेष.