कलंबिस्त स्कूलमध्ये प्रवेशोत्सव

Edited by: विनायक गांवस
Published on: June 17, 2025 17:33 PM
views 159  views

सावंतवाडी : कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त मध्ये नवांगताचे विद्यार्थ्यांच्या स्वागताचा 'प्रवेशोत्सव  व मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम' संपन्न झाला. 


यावेळी व्यासपीठावर कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुभाष सावंत, वसंत सावंत, सूर्यकांत राजगे, कलंबिस्त उपसरपंच सुरेश पास्ते, पालक शिक्षक संघ सदस्या श्रीम.अश्विनी गोसावी,  मुख्याध्यापक अभिजीत जाधव,पालक रविंद्र तावडे, गणू सावंत, श्रीम. सावंत, प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी नवीन शैक्षणिक वर्षात शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर  शासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक सुभाष सावंत, मुख्याध्यापक अभिजीत जाधव,शिक्षक विलास चव्हाण, श्रीम. विनिता कविटकर आदींनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी तर आभारप्रदर्शन श्रीम.श्रद्धा पराडकर यांनी केले.