आकेरी शाळेत प्रवेशोत्सव

Edited by: विनायक गांवस
Published on: June 18, 2025 21:31 PM
views 182  views

सावंतवाडी : जि.प .पू.प्रा.शाळा आकेरी नं.१ मध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सिद्धेश घोगळे, आकेरी सरपंच महेश जामदार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित दिमाखात साजरा करण्यात आला.

शाळा प्रवेशोत्सवाचे औचित्य साधत शाळेत प्रभातफेरी, नवागतांचे औक्षण करून स्वागत, हातांचे पायांचे ठसे, मोफत पाठयपुस्तक वितरण, मोफत गणवेश वितरण, वृक्षारोपण, एक पेड माँ के नाम अंतर्गत इयत्ता  पहिलीच्या मुलांना वृक्षवाटप, वृक्षसंवर्धन प्रतिज्ञा, मुलांना खाऊवाटप, सेल्फी पाँईट अशा वैविध्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले होते .

उपक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका काजल जोशी यानी केले, उपस्थितांचे स्वागत अर्चना कविटकर यांनी केले,उपक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन  स्वाती कुंभार, संगिता म्हाडगुत यानी केले आणि आभार सायली आटक यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व समित्यांचे सदस्य ग्रामस्थ, पालक यानी मोलाचे सहकार्य केलें