दौड आरोग्याची,साद देवगड पर्यटनाची’ या 'देवगड रन' उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद

Edited by:
Published on: December 29, 2024 18:40 PM
views 282  views

देवगड : देवगड तालुका रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी आणि डॉक्टर फ्रटरनिटी क्लब, देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित देवगडच्या पर्यटन वाढीसाठी ‘दौड आरोग्याची,साद देवगड पर्यटनाची’घोषवाक्य सहीत रविवार दिनांक २९ डिसेंबर रोजी" देवगड रन" उपक्रमात देवगड तालुक्याबरोबर संपूर्ण जिल्ह्यातील तसेच रत्नागिरी कोल्हापूर येथील स्पर्धक धावपटू ५ किमी मध्ये ३५० व १०किमी सुमारे  १०० स्पर्धक यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी देवगड रन च्या टी-शर्ट चे अनावरण रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी चे अध्यक्ष मनस्वी घारे सचिव गौरव पारकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पास्ट प्रेसिडेंट श्रीपाद पारकर रोटे. दयानंद पाटील, अनिल गांधी, मनीषा डामरी, नरेश डांबरी,एकनाथ तेली आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत देवगड तालुक्यातील तळवडे येथील मयूर सावंत याने १० की मी अंतर ४२ मिनिटात पार केले तर मुणगे येथील प्रथमेश पुजारे याने ५ किमी अंतर १९ मिनिटात पार केले तसेच महिला वर्गात मालवण येथील मेघा सातपुते,आणि दिविजा सातपुते या भगिनींनी ५ की मी अंतर सर्व प्रथम पार केले.१२ वर्षापर्यंत मुलांमध्ये मित अमित पाटील,(५ किमी) अर्णव माधव घोगरे (१० किमी)यांनी विशेष कामगिरी केली.

या स्पर्धेचा शुभारंभ सकाळी ६.०० वाजता हॉटेल डायमंड येथून करण्यात आला.यावेळी देवगड रन ला मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग दाखवून सुरुवात करण्यात आली.देवगड ते तारामुंबरी परत देवगड डायमंड हॉटेल (५ किमी,)देवगड तारामुंबरी पूल ते मिठमुंबरी पूल परत देवगड (१० किमी असे देवगड वासीय धावले व यातून पर्यटन वाढीबरोबर पर्यावरण,व आरोग्याचा सन्देश देत देवगड रन यशस्वी केले.यावेळी मान्यवर आयोजकांच्या हस्ते सर्व सहभागी धावपटू याना मेडल प्रदान करून गौरविण्यात आले.

या निमित्ताने मार्गदशन करताना रोटे.असी. गव्हर्नर डॉ विद्याधर तायशेट्ये यांनी पुढील वर्षी देवगड रन उपक्रम २१ डिसेंबर रोजी राबविण्यात येऊन यात २१ किमी हाफ मॅरेथॉन आणि लहान मुलांकरिता १ किमी फन रन चे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले,.प्रारंभी सूर्योदय पूर्वी युवर्स फिटनेस क्लब च्या वतीने झुंबा वॉर्मअप  करण्यात आले. देवगड रन  ५ कि.मी साठी व १० किमी मध्ये पार  पडले.देवगड रन या उपक्रमात २.५ किमी अंतरावर पिण्याचे पाणी,प्रथमोपचार तसेच १०८ रुग्णवाहिका सुविधा निर्माण करण्यात आली होती. या उपक्रमात देवगड रन मध्ये कोणताही अडथळा येवु नये याकरिता देवगड पोलीसानी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी रोटरी असिस्टंट गव्हर्नर डॉ विद्याधर तायशेट्ये,डॉ प्रशांत मढव,डॉ फ्रर्टिनिटी क्लब चे अध्यक्ष डॉ सतीश लिंगायत, सचिव किरण पाटणकर खजिनदार स्वप्नील शिंगाडे,व अन्य सदस्य माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर , देवगड ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ पाटोदेकर ,पशुधन अधिकारी डॉ माधव घोगरे,रोटे. प्रवीण पोकळे एकनाथ तेली अनिकेत बांदिवडेकर,गुरुनाथ बांदिवडेकर,रमाकांत आचरेकर,राजेंद्र भुजबळ,अनिल कोरगावकर,नरेश डामरी, आदी उपस्थित होते.या वेळी सूत्रसंचालन तन्वी चांदोस्कर यांनी केले.