महिला बचतगटांसाठी एक पाऊल !

कोळंब येथे भव्य प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 09, 2023 15:03 PM
views 185  views

मालवण : आपल्या गावातील महिला बचतगटांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आणि मार्केटमध्ये त्यांनी बनविलेल्या पदार्थांना एक स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने कोळंब गावातील उमेद महिला बचतगटांच्या महिलांनी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोळंब ग्रामपंचायत आणि समर्थ हाॅल या व्यवस्थापनानेही त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला बचतगटातील महिलांनी बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात मांडून त्यांना आर्थिक फायदा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अभिनय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संस्कृती कोकणची, आमच्या मालवणची' हि टॅग लाईन घेण्यात आलेली आहे. या टॅग लाईनखाली महिला बचतगटांना एकत्रित करण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे.


उमेद, ग्रामपंचायत कोळंब व समर्थ हाॅल कोळंब यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थीसाठी लागणारे सर्व वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री अर्थात `संस्कृती कोकणची, आमच्या मालवणची' हा मालवण तालुका मर्यादित उपक्रम 9 ते 17 सHटेंबर या कालावधीत समर्थ हाॅल कोळंब मालवण याठिकाणी आयोजित केले आहे. माहिला समुहांनी तयार केलेल्या अनेक उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देणे तसेच त्यांना विक्रीचा अनुभव येण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागातील माहिला समुहांनी तयार केलेल्या अनेक वस्तु एकाच छताखाली पाहायला मिळत आहे. या उपक्रमाला तालुक्यातील महिला बचतगटांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला आहे. तालुक्यातील 25 बचतगटांनी सहभाग नोंदविला आहे.


कोकणात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात घराघरात साजरा करण्यात येत असतो. या उत्सवात मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील अनेक बंद घरेही उघडली जात असतात. मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावात दाखल होत असतात. आता कोकणरेल्वेमुळे अगोदर चार दिवस येणारे चाकरमानी गणेशोत्सवाच्या अगोदर एक दिवस दाखल होतात. यामुळे त्यांनी गणपती या उत्सवासाठी आवश्यक असणारे साहित्य आणि इतरही सर्व गोष्टी उपलब्ध करण्यासाठी शहरात धाव घ्यावी लागत आहेत. याच गोष्टीकडे लक्ष ठेवून उमेद या महीला बचत गटाच्या प्रतिनिधीनी चाकरमान्याची होणारी धावपळ थांबवून त्यांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक उत्सवासाठी साहित्य मिळावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. 

याचे उद्घाटन सरपंच सौ. सिया धुरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वकील हेमेंद्र गोवेकर, उपसरपंच विजय नेमळेकर, प्रसाद बांदेकर, सर्मथ हाॅलचे प्रविण सावंत, पत्रकार मनोज चव्हाण, उन्नती ग्राम संघाच्या अध्यक्षा दीपलक्ष्मी मेथर, मेघना चव्हाण, एकता ढोलम, दर्शना चव्हाण, स्वाती सावंत आदी उपस्थित होते. 

ज्या महिला समुहांना आपल्या उत्पादनासाठी स्टाॅल मांडायाच्या असतील त्यांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी कोळंब सरपंच सिया धुरी (7506453362), दिपलक्ष्मी मेथर (9404170505) दर्शना चव्हाण (9405909567) यांच्याशी संपर्क साधावा.