विकसित भारत संकल्प यात्रेचे दोडामार्गात उत्स्फूर्त स्वागत !

नगराध्यक्ष चेतन चव्हाण - सीईओ यांनी केलं मार्गदर्शन
Edited by: संदीप देसाई
Published on: January 07, 2024 13:27 PM
views 105  views

दोडामार्ग : विकसित भारत संकल्प यात्रेचे न दोडामार्ग शहरात नगरपंचायत व नागरिकांनी उस्फुर्त स्वागत केले. विकसित संकल्प यात्रेचा रथ येथे आल्यानंतर नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते रथावरील फीत कापून स्वागत करण्यात आले. 

यावेळी कसई - दोडामार्ग नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी सागर साळुंखे, उपनगराध्यक्ष  देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, शिक्षण व आरोग्य सभापती गौरी पार्सेकर, नगरसेविका संजना म्हावळणकर, स्वराली गवस, क्रांती जाधव, वासंती मयेकर, स्वीकृत नगरसेवक डॉ. सीताराम खडपकर, जिल्हा उद्‌योग केंद्र सिंधुदुर्ग ओरोस व्यवस्थापक रवींद्र पत्की, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी वसीम खाटिक, नगरपंचायत अभियंता प्रबोधन मठकर, नगरपंचायत कार्यालयीन कर्मचारी संजय शिरोडकर, वर्षा गवस, सुभाष केतकर, स्वप्नील सावंत, सिद्धेश शेगले आदी उपस्थित होते. 


उपस्थित मान्यवरांचे नगराध्यक्ष चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत  करण्यात आले. तद्नंतर मुख्याधिकारी साळुंखे व रवींद्र पत्की, नगराध्यक्ष चव्हाण यांनी विकसित भारत संकल्प यातेबाबत उपस्थितांना  मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावेळी स्वच्छ भारत मिशन, आयुष्यमान कार्ड योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, आधार कार्ड अद्ययावत करणे या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. या  कार्यक्रमाचे सूत्र संचालन  नगरसेवक डॉ. सीताराम खड़पकर यांनी केले. प्रभारी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी सर्वाचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.