आरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद

कोकण कला व शिक्षण विकास संस्था, ग्रा.पं.केर भेकुर्लीचं आयोजन
Edited by: संदीप देसाई
Published on: December 26, 2023 16:40 PM
views 170  views

दोडामार्ग : कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत केर भेकुर्ली यांच्यावतीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील 0 ते  6 वयोगटातील बालके व सर्व ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच रुक्मिणी नाईक, उपसरपंच तेजस देसाई, ग्रामसेवक संदीप पाटील, संस्थेचे ट्रस्टी देवानंद कुबल, जिल्हा समन्वयक समीर शिर्के, प्रकल्प समन्वयक हनुमंत गवस, समन्वयक बाळकृष्ण शेळके, भावना साटम, एसएसपीएमचे डॉ. अजय वर्मा, बालरोगतज्ञ डॉ. प्रियांका सावंत, नेत्ररोग तज्ञ डॉ. संजय विनायक जोशी, वन्यजीव अभ्यासक गिरीश पंजाबी, संतोष मोर्ये आदी मान्यवर व गावातील ग्रामस्थ  व महिला-बालके मुली उपस्थित होत्या. या शिबिरात  0 ते  6 वयोगटातील मुले, पुरुष, महिला, जेष्ठ नागरिकांची व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. या शिबिरासाठी उपसरपंच तेजस देसाई व ग्रामसेवक संदीप पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमप्रसंगी कोकण संस्थेच्या आरोग्य, कौशल्य विकास, शिक्षण, क्रीडा, कृषी, पाणी व स्वच्छता, निवारा केंद्र व इतर प्रकल्पा विषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी शंकर देसाई , गावातील ग्रामस्थ व संस्थेच्या कार्यकर्त्याचे सहकार्य लाभले. आरोग्य शिबिराच्या उद्घाटन दीपप्रज्ज्वल करून करण्यात करण्यात आले. कोकण संस्थेचे कार्यक्रम समन्वयक हनुमंत गवस व देवानंद कुबल यांनी गुलाब पुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक समीर शिर्के यांनी केले. प्रस्ताविक हनुमंत गवस यांनी केले. तर आभार बाळकृष्ण शेळके यांनी मानले. स्वामी समर्थ मेडिकल मेडिकलचे मालक राजदत्त वेटे यांच्याकडून या शिबिरासाठी काही औषधे मोफत देण्यात आकित त्यांचेही ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.