उमलत्या वयात आयुष्य संपवलं

Edited by: लवू परब
Published on: September 20, 2024 08:38 AM
views 1239  views

दोडामार्ग : कुंब्रल वरचीवाडी येथील महादेव आनंद सावंत  ( वय २० ) या  वर्षीय तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याची घटना काल घडली. दोडामार्ग शहरात राहत असलेल्या आपल्या फ्लॅट मध्ये त्याने विष प्राशन केले होते. त्याच्यावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरु असताना त्याचे आज सकाळी निधन झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, कुंब्रल मधील महादेव सावंत हा युवक आपल्या कुटुंबासहित येथील तहसीलदार कार्यालयनजीकच्या एका इमारतीमधील फ्लॅट मध्ये राहत होता. त्याने विष घेतल्याचे काल मंगळवारी कुटुंबीयांना आढळून आले. महादेवला तातडीने सुरुवातीला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर अधिक उवचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार चालू असता आज गुरुवारी सकाळी त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या निधनाने कुंब्रल परिसरातील व त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. 

महादेव एक उत्कृष्ठ कबड्डीपटू

महादेव हा मनमिळाऊ तसेच नेहमी हसरा चेहऱ्याने वावरत असे. तो एक उत्कृष्ठ कबड्डीपटू देखील होता. तालुक्यात कोणत्याही कबड्डी स्पर्धा असेल तर तो त्या ठिकाणी हमखास दिसत असे. गोव्यातील एका हॉटेल मध्ये सध्या तो कामाला जात होता.