रोजगार मेळावा बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : मंत्री नितेश राणे

कणकवली महाविद्यालयात पं. दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 22, 2025 18:19 PM
views 40  views

कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे राज्यात १०० ठिकाणी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा रोजगार मेळावा हा उपक्रम स्तुत्य आहे. हा रोजगार मेळावा बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील बेरोजगारांनी या रोजगार मेळावाचा लाभ घेऊन सुवर्णसंधीचे सोने करावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,आणि कणकवली महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मंत्री राणे बोलत होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरम, जिल्हा कौशल्य विभागाचे आमिण तडवी, जिल्हा व्यवसाय शिक्षण विभागाचे अनिल मोहारे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. हरिभाऊ भिसे, कणकवली ज्यु. कॉलेजचे पर्यवेक्षक श्री. माने आदी मान्यवर उपस्थित होते. 

मंत्री राणे म्हणाले, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री मंगल प्रभात लोढा संकल्पनेतून  पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा प्रत्येक जिल्ह््यात आयोजित केला जात आहे. त्यामुळे बेरोजगारांना आपल्या जिल्ह््यातच रोजगार उपलब्ध होत आहे. महायुती सरकारचा रोजगार मेळाव्याचा उपक्रम स्तुत्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार राज्यात रोजगारनिर्मिती व्हावी आणि परदेशी गुंतवणूक वाढीसाठी यादृष्टीने काम करीत आहे. वाढवण बंदरामुळे कोकण पट्टयातील जिल्ह््यांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह््यातील बेरोजगारांना वाढवण बंदर प्रकल्पामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता जिल्ह््यातील आयटीआयमध्ये कौशल्य प्रशिक्षण कोर्स लवकरच सुरू केले जाणार आहेत. हे कौशल्य प्रशिक्षण कोर्सचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन वाढवण बंदरामुळे उपलब्ध होणाºया रोजगार संधीचा लाभ उठवावा, असे आवाहन त्यांनी केले. 

राजश्री सांळुखे म्हणाल्या, सध्या युग टेक्नॉलॉजी व इंटरनेटचे आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह््यातील विद्यार्थ्यांनी टेक्नॉलॉजी व इंटरनेट वापराचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकी शिक्षणाबरोबर कौशल्य विषयक शिक्षण घेतले पाहिजे. कारण भविष्यात कौशल्य आत्मसात केलेल्यांना अच्छे दिन येणार आहेत. युवा पिढी देशाचे भवितव्य असून त्यांनी विविध प्रकारची कलाकौशल्य शिकून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून देशाची मान उंचवावी, असे आवाहन त्यांनी केले. युवराज महालिंगे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात भैय्याजी येरम यांनी रोजगार मेळावा घेण्यामागील शासनाचा उद्देश सांगितला. आरंभी सरस्वती मातेच्या मूर्ती मान्यवरांनी पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलन करून या मेळाव्याचे उद्घाटन केले. मंत्री व मान्यवरांचे स्वागत भैय्याजी येरम यांनी केले. शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने डॉ. राजश्री साळुंखे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार केला. आयोजकांनी उपस्थित उद्योजकांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एम.एन.सावंत यांनी केले. या मेळाव्याला उद्योजक, नोकरी इच्छुक तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.